नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 51 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (18) रोजी शोध पथकाने 83 प्रकरणांची नोंद करून 52,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 23 प्रकरणांची नोंद करून 9,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 200/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 2,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 23,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/ रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 32 प्रकरणांची नोंद करून 6,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून 4,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. आर.एम.एस डेव्हलपर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच शीतल कोटेचा यांनी पोकलॅडद्वारे रस्त्याचे नुकसान करून मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रू. 15,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. चरडे किराणा स्टोअर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. वृदांवम फुड प्रॉडक्ट यांनी सेव्हर लाईन ब्लॉक केल्याबद्दल रू. 15,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच मे. श्री शीव स्वीट्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगळवारी झोन दीपक सहानी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू. 55,000/- दंड वसूल केला.