नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 51 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (25) रोजी शोध पथकाने 96 प्रकरणांची नोंद करून 66,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 34 प्रकरणांची नोंद करून 13,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 400/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून 35,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी /वाहणे जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/ रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 3000 रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2,000/ रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 26 प्रकरणांची नोंद करून 5,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 6,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. निसर्ग इन्फ्रा रिलीटिज यांनी विनापरवागीशिवाय बॅनर लावल्याप्रकरणी रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. श्रीनिवास होम मेकर यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत डॉ. माधुरी लोहकरे यांनी वैद्यकीय कचरा टाकल्याने महानगरपालिकेच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. तसेच मे. गिरीश हाय- टेक 2 यांनी माती आणि गाळ रोड आणि फुटपाथ वर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच डॉ. चैतना गुरूंग यांनी बांधकाम दरम्यान चेंबर तोडल्याने रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. धवनि एनक्लेव यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. अजंटा स्वीट्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन मे. सलीम किराणा यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू. 55,000/- दंड वसूल केला.