मतदान जनजागृतीसाठी आरोग्य शिबिर सोमवारी
व्यापारी असोसिएशनचा पुढाकार : १०० टक्के मतदानाचा संकल्प
Date : 17 Nov 2024
मतदान जनजागृतीसाठी नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य दर्शविण्यासाठी व्यापारी असोसिएशनने यापूर्वी दी होलसेल क्लॉथ अँड यार्न मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. नारायण तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेत बैठक घेऊन व्यापारी बांधवांमध्ये मतदान जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरामध्ये स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन खापरी चे जनरल फिजिशियन यांचेद्वारे आरोग्य तपासणी तर श्री माहेश्वरी युवक संघ सार्वजनिक दवाखाना यांचे मार्फत पॅथॉलॉजी सेवा देण्यात येणार आहे. ऑर्थोस्कोपिक सर्जन, किडनी तपासणी, मधुमेह, यकृत तपासणी, रक्तदाब आदी तपासण्या आरोग्य शिबिरात करण्यात येतील. यावेळी व्यापारी बांधवांना मतदानाचे महत्व पटवून दिले जाईल व त्यांनी स्वत:सह परिवारातील सदस्यांनी देखील मतदान अवश्य करावे याबाबत जागरूक करण्यात येणार आहे.
मतदान जनजागृतीसाठी आयोजित आरोग्य शिबिराकरिता दी होलसेल क्लॉथ मार्केट सोसायटी, नागपूर सराफा असोसिएशन, सोना चांदी गलाई असोसिएशन, दी स्टेनलेस स्टील अँड मेटल मर्चेंट असोसिएशन, जागनाव रोड मर्चेंट असोसिएशन, नवयुवक सराफा असोसिएशन, हार्डवेअर डिलर्स असोसिएशन, केळीबाग रोड असोसिएशन या संस्थांचे सहकार्य आहे. या शिबिरामध्ये सहभागी होउन जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन व्यापारी असोसिएशनचे सर्वश्री नारायण तोष्णीवाल, प्रताप थावरानी, मुकेश जसोरे, पुरुषोत्तम कावले, अशोक संघवी, पंकज मुनियार, शरद मोदी, राजेश जैन, विनय जैन, मनोज लुनावत, नंदकुमार गडदे, अतुल गायकवाड, सुभाष पवार, ओंकारेश्वर गुरव, राजकुमार गुप्ता, महावीर लटूरिया, जतिन शाह, हितेश लाड़, रॉकी बत्रा, मोहन गट्टानी, संजय गुप्ता, महेशकुमार कुकडेजा, रामअवतार तोतला, हेमंत खुंगर, कमल किशोर सारडा, ओमप्रकाश लालवानी, संजय सिरपुरकर, गौरव जाजू, उमाकांत जाजू, अरविंद चांडक, राजेश लोया यांनी केले आहे.