आपले एक मत अमूल्य, मतदान अवश्य करा : डॉ. अभिजीत चौधरी
Date : 18 Nov 2024
येत्या बुधवारी २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान आहे. नागपूर शहरात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. २० नोव्हेंबर रोजी शहरातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येत आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. आपल्या देशात, राज्यात लोकशाही बळकट करण्यासाठी आपले एक मत अत्यंत अमूल्य आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा, असेही आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
२० नोव्हेंबरला सर्व मतदान केंद्रांवर प्रशासनामार्फत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील सुविधा करण्यात आलेल्या आहेत. मतदाराला आपले मतदान केंद्र कुठे आहे हे माहित करून घेण्यासाठी ‘वोटर हेल्पलाईन’ ॲप डाउनलोड करून त्यावरून ते शोधता येईल. या सर्व निवडणुकीसाठी आपण सर्वांनी लाभ घ्यावा व मतदानाचा हक्क बजावावा. सर्वांच्या पुढाकारामुळे नागपूर शहरातील मतदानाची टक्केवारी नक्की वाढेल, असा विश्वास मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी व्यक्त केला आहे.