मनपा तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन
Date : 28 Nov 2024
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपा उपायुक्त श्रीमती विजया बनकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तैल चित्राला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त श्री. श्याम कापसे, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, राजेश गजभिये, राजेश लिहितकार, प्रमोद हिवसे, मुकेश मोरे, कैलास लांडे व इतर उपस्थित होते.
Back To Home Page