मनपाच्या दिव्यांग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
दिव्यांग बांधवांनी घेतला लाभ : दरमहा ५०० रुपये मिळणार निर्वाह भत्ता
Date : 11 Dec 2024
याकरिता दिव्यांगांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. दिव्यांगांना अधिक सोयीचे व्हावे म्हणून दिव्यांग कक्ष, समाज विकास विभाग, जुने कार्यालय, जेष्ठ नागरिक कक्षाच्या बाजुला महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे ११ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२४ पर्यंत सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑफलाईन अर्ज स्विकारले जात आहे. त्यामुळे या शिबिराचा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन समाजविकास विभागाच्या उपायुक्त डॉ.रंजना लाडे यांनी केले आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या नेतृत्वात आयोजित शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहायक अधिक्षक सुरेंद्र सरदार, विद्युत सहायक अभियांत्रिकी चंद्रशेखर पाचोडे, कनिष्ठ लिपिक निकेष बनसोड, उच्च लिपिक शारदा गडकर, व्यवस्थापक नतून मोरे, व्यवस्थापक रितेश बांते यांच्यासह विभागातील कर्मचारी आणि ऑपरेटर सहकार्य करीत आहेत.
दिव्यांगांकरिता बसण्याची सुविधा
महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे आयोजित या शिबिराला येणाऱ्या दिव्यांग बांधव व त्यांच्या सहकार्या करिता महानगरपालिकातर्फे कोणतीही अडचण येउ नये म्हणून बसण्यासाठी खुर्च्या तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
दिव्यांग बांधवांनी घेतला लाभ
महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे आयोजित दिव्यांग शिबिराला जवळपास ------इतक्या दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला. यामध्ये पुरुष आणि महिला वर्गाचा समावेश होता.
शिबिरामध्ये उपस्थित राहताना आवश्यक गोष्टी
१. कुटुंबाचे महानगरपालिका क्षेत्रात किमान तीन वर्षे वास्तव्य असल्याबाबत पुरावा म्हणून मालमत्ताधारक असल्यास चालू वर्षाचा मालमत्ता कर भरल्यांबाबतची पावती/निवडणूक ओळखपत्र / मतदार यादीतील नांव/ पाणीपट्टी / विजबिल/तीन वर्षाचा भार्ड करारनामा / पासपोर्ट / रेशनकार्ड/ विवाह नोंदणी दाखलापुरावा म्हणून सादर करावा लागेल. (उपरोक्त पैकी कोणतेही दोन पुरावे सादर करणे अनिवार्य राहील.)
२.UDID कार्ड, दिव्यांगाचे प्रमाणपत्र
३.आधार कार्ड
४.राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
५.अर्जासोबत अर्जदाराचा अलीकडील काळात काढलेला पासपोर्ट साईज फोटो लावणे आवश्यक
६.मनपा अंर्तगत लाभ न घेण्यात आल्या बाबतचे १००/- रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र किंवा स्वयंघोषणा पत्र लेखी स्वरूपात
७.अर्जा सोबत जोडण्यात आलेल्या सर्व छायांकीत प्रती स्वयंसाक्षांकित करण्यात यावा.
८.सदर योजनेंतर्गत अनाथ किंवा अर्जदारांचा पालन पोषण करणारा व्यक्ती कुटुंबात उपलब्ध नाही, अशा मतीमंद, सेरेबल पालसी, ऑटीझम, विशेष विकलांग, बहुविकलांग प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थ्यांची प्रथम प्राधान्याने अटी व शर्तीच्या अधिन राहून निवड करण्यात येईल. याबाबत रु. १००/- चे स्टॅम्प वर किंवा स्वयं घोषणापत्र लेखी स्वरुपात देणे बंधनकारक राहील. भविष्यात मौका चौकशी मध्ये तफावत आढळून आल्यास सदर योजनेचा लाभ बंद करण्यात येईल. वरील सर्व कागदपत्रांसह दिव्यांग लाभार्थी अथवा त्यांच्या पालकांनी शिबिरामध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे.