नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (11) रोजी शोध पथकाने 65 प्रकरणांची नोंद करून 86,800/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 7,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 3,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 16,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 6,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. हरित लवाद यांनी दिलेल्या दि. 03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह 1 प्रकरणांची नोंद करून 50,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. मोहित इन्फ्रास्ट्र्रकचर यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत नरेंद्र बेनीवाल यांनी मोठ्या प्रमाणात कचरा व बांधकामचे साहित्य जवळच्या कालव्यात टाकल्याबद्दल आणि चेंबरचे नुकसान होत असल्यामुळे रू. 50,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच श्री. निनाद नलगे यांनी बांधकामाचे साहित्य चेंबरमध्ये टाकल्याबद्दल रू. 50,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत मे. वेद बिल्डकॉन यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन मे. गौरव एन्टरप्राइझेस यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. सोमकुवर बेकरी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू. 1,25,000/- दंड वसूल केला.