नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (13) रोजी शोध पथकाने 98 प्रकरणांची नोंद करून 53,800/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 22 प्रकरणांची नोंद करून 8,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 3,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 15,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली. वैद्यकिय व्यवसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 10,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/ रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा / टाकवू कचरा टाकणे साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा / टाकवू कचरा टाकणे साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 40 प्रकरणांची नोंद करून 8,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 5 प्रकरणांची नोंद करून 5,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. लोकशेरे ग्रिन अपार्टमेंट यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. सुविधा स्विट भंडार यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. एल के फुड यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अंतर्गत मे. बब्लु किराणा स्टोअर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. नाईस क्लिनिक यांनी बायोमेड कचरा इतर सामान्य कचऱ्यासह बांधकामाचे साहित्य रस्त्याच्या कडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 30,000/- दंड वसूल केला.