हेरिटेज टास्क फोर्स समितीद्वारे कस्तुरचंद पार्क व झिरो माईलचे निरीक्षण
निरीक्षण अहवाल उच्च न्यायालयात करणार सादर
Date : 13 Dec 2024
हेरिटेज टास्क फोर्स समितीचे सदस्य मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक श्री. मयुरेश खोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. अविनाश गुल्हाने, व्हीएनआयटीचे स्ट्रक्चरल इंजिनिअर श्री. आर.के. इंगळे, वास्तुशिल्पकार श्रीमती मधुरा राठोड, हेरिटेज संवर्धन तज्ज्ञ डॉ. लीना रामकृष्णन हे या निरीक्षण दौऱ्यामध्ये उपस्थित होते.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्री. अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेत नवीन हेरिटेज संवर्धन समिती गठीत करण्यात आली आहे. देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर शहरातील कस्तुरचंद पार्क आणि झिरो माईल या ऐतिहासिक स्थळांचे जतन, संवर्धन आणि सौंदर्यीकरण च्या संदर्भाने मा. उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल आहेत. त्याअनुषंगाने या दोन्ही स्थळांच्या दुरूस्ती, नूतनीकरणाचे कार्य सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ यांचेद्वारे सुरू करण्यात आले आहे. या कामाचे मौका निरीक्षण करून त्याचा अहवाल मा.उच्च न्यायालयात सादर करण्यासाठी हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री. अनूप कुमार यांनी टास्क फोर्स समिती गठीत केली होती. या समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी (ता.१३) दोन्ही ऐतिहासिक स्थळांना भेट दिली व मौका निरीक्षण केले.
हेरिटेज संवर्धन समिती अध्यक्षांच्या निर्देशानुसार टास्क फोर्स समिती सदस्याद्वारे मौका निरीक्षणाचा अहवाल मा. उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.