अतिक्रमण कारवाई
Date : 30 Jan 2025
धरमपेठ झोन क्र ०२ आणि गांधीबाग झोन क्र ०६ अंतर्गत पथक क्र.१ यांनी मिळुन संयुक्तरीत्या अतिक्रमण निर्मूलन कारवाई दुपारी 12:00 वाजेपासून ते रात्री 9:00 सुरू केली आहे .अंतर्गत श्री दिवाकर रामचंद्र कवडे धारस्कर रोड, सिटी पोस्ट ऑफिस समोर, इतवारी नागपूर येथे शिकस्त बांधकामाची कारवाई करण्यात आली ज्यामध्ये यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-2012 चे कलम 264 (मोगवटदारांकरिता) अंतर्गत दिनांक 08.06.2021 रोजी झोनद्वारा नोटिस तामिळ करण्यात आले होते. तर आज अतिक्रमण पथकाद्वारा यांच्या शिकस्त झालेले अत्यंत धोकादायक क्षेत्र वर कारवाई करण्यात आले ज्यामध्ये शिकस्त झालेले भिंत चे बांधकाम काही भाग जेसीबी मशीनद्वारे आज तोडण्यात आले त्यानंतर धरमपेठ झोन कार्यालय ते सिताबडी परिसर ते झांसीराणी चौक ते पंचशील चौक ते मेहाडिया चौक ते लोकमत चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई सुरू आहे ज्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात येत आहे. कारवाई मध्ये अनधिकृत बांधकामाची धारकांची संख्या अंदाजे 30 वर सुद्धा अतिक्रमण ची करवाई करण्यात येत आहे आतापर्यंत कारवाई मध्ये 01 ट्रक साहित्य सामान जप्त करण्यात आले आहे तसेच कारवाई सुरू आहे.
ही कारवाई .श्री. हरिष राऊत सहा. आयुक्त अतिक्रमण विभाग व श्री संजय कांबळे प्रवर्तन अधीक्षक यांचे मार्गदर्शनात श्री अनंत मानकर कनिष्ठ अभियंता,श्री भास्कर माळवे कनिष्ठ अभियंता आणि अतिक्रमण पथक द्वारे करण्यात आली.