सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 71 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 31 Jan 2025
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (31) रोजी शोध पथकाने 71 प्रकरणांची नोंद करून 42,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 100 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 4,00/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून 18,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2,000/ रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 5,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 24 प्रकरणांची नोंद करून 4,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 3 प्रकरणांची नोंद करून 3,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
Back To Home Page
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत श्री. मनोज सिंनगडे यांनी फूटपाथ रोडवर भंगार साहित्य पसरविल्यामुळे रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत श्री. निखिल देशपांडे यांनी अनधिकृत ठिकाणी ट्रकमधून कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत मे. आर संदेश एल एल पी यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. शहीद यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 4 प्रकरणांची नोंद करून रू. 25,000/- दंड वसूल केला.