‘शिक्षणोत्सव' अंतर्गत क्रीडा स्पर्धा ३ फेब्रुवारीपासून
विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक गुणांना वाव देणारा उत्सव
Date : 31 Jan 2025
२२ जानेवारी २०२५ रोजी शिक्षणोत्सवाचा शुभारंभ झाला. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आता विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. ३ आणि ४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाल येथील चिटणीस पार्क येथे इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता तर ५ ते ७ फेब्रुवारी २०२५ रोजी धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
३ फेब्रुवारी व ४ फेब्रुवारी रोजी चिटणीस पार्क नागपूर येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास मशाल दौडनी कार्यक्रमाची सुरुवात होईल. याठिकाणी क्रीडा प्रतिज्ञा (sports pledge) देखील घेतली जाईल. क्रीडा स्पर्धांमध्ये मनपा शाळेतील इयत्ता १ ते ५चे जवळपास ७९५ विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतील. ३ फेब्रुवारी रोजी ५० मी दौडमध्ये ८० शाळेचे विद्यार्थी भाग घेणार आहेत, बुक बॅलेन्समध्ये ५८ शाळेचे विद्यार्थी भाग घेतील, ऑब्स्टॅकल दौडमध्ये ५४ शाळेचे विद्यार्थी भाग घेतील, तीन पायाची दौडमध्ये २९ शाळेचे विद्यार्थी भाग घेणार आहेत, स्टिक बॅलेन्समध्ये २५ शाळा, सॅक रेसमध्ये ५६ शाळा, रोलर टॅंकमध्ये ४८ शाळा भाग घेणार आहेत. ४ फेब्रुवारी रोजी मुलांची कबड्डी व मुलींची लंगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
५ ते ७ फेब्रुवारी रोजी यशवंत स्टेडियमला इयत्ता ६ ते ८ आणि ९ ते ११ वी च्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील. यावेळी रस्सी खेच (१० ते १५ टीम मेंबर), १०० मी दौड, शॉट पुट, डिस्क थ्रो, खो-खो हे खेळ ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येतील. कबड्डी, व्हॅलीबॉल, लंगडी, क्रिकेट हे खेळ ६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येतील तर फुटबाँल, कॅरम आणि चेस हे खेळ ७ फेब्रुवारीला घेण्यात येतील.
यशवंत स्टेडियमला एकत्मता शाळेच्या ५० विद्यार्थिनी लेझीम सादर करतील. मनपाच्या १० शाळा शाळेच्या नावाचे फलक आणि बोर्ड घेऊन मार्च पास करतील. यावेळी मशाल दौड देखील होईल. जयताळा शाळा मानवी मनोरे, योग प्रात्यक्षिके सादर करतील. लाला बहादूर शास्त्री शाळेकडून रॅली काढण्यात येईल. एमके आझाद शाळेचे विद्यार्थी जुडो-कराटे चे प्रात्यक्षिक दाखवतील. आकांशा शाळेकडून हुलाहुब सादर करण्यात येईल. यावेळी क्रीडा प्रतिज्ञा (sports pledge) देखील घेतली जाईल. रस्सी खेच या खेळणे क्रीडा स्पर्धेची सुरवात होईल.
शिक्षणोत्सव कार्यक्रमाचा समारोप १० फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट्ट सभागृहामध्ये होणार आहे.