मनपाच्या ‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’चे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकापर्ण
रस्ते आणि उड्डाणपुलांच्या सफाईसाठी ठरणार मतदगार
Date : 01 Feb 2025
सिव्हिल लाईन्स येथील जिल्हा नियोजन भवन परिसरात फित कापून पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’चे लोकार्पण केले. याप्रसंगी राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल, खासदार श्री. श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, परिणय फुके, कृष्णा खोपडे, विकास ठाकरे, समीर मेघे, चरणसिंग ठाकूर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. संजयकुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी, मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त श्री. विजय देशमुख, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. राजेश गुरमुळे, उपअभियंता श्री. उज्ज्वल लांजेवार आदी उपस्थित होते.
नागपूर शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. त्याचप्रमाणे चार पदरी रस्त्यांचे व उड्डाणपुलांचे जाळे देखील वाढत आहेत. त्यामुळे शहरातील वायु प्रदुषणामध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वाढत आहे. याशिवाय रस्ते स्वच्छ करण्याकरीता लागणारा मनुष्यबळ अपुरा पडत असल्याकारणाने यांत्रिकी पध्दतीचा वापर करुन मुख्य रस्ते व उड्डाणपुलांची साफसफाई करणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानांचा वापर करणे काळाची गरज असल्यामुळे नागपूर महानगरपालिकेद्वारे १५व्या वित्त आयोगातील अनुदानातुन चार ‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’ (Mechanized Road Sweeping Machines) खरेदी करण्यात आलेल्या आहेत.
या यापूर्वी २०२२ मध्ये राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमाअंतर्गत (NCAP) प्राप्त निधीतून मनपाद्वारे दोन ‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’ (Mechanized Road Sweeping Machines) खरेदी करण्यात आलेल्या होत्या. मे. ॲन्थोनी वेस्ट हँडलींग सेल, ठाणे यांचे कडून एक ‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’ भाडेतत्वावर घेउन वापरण्यात येत आहे. ज्या सध्या शहरातील चार पदरी रस्ते व उड्डाणपुलांची सफाई करण्याकरीता वापरण्यात येत आहे. अशाप्रकारे जुन्या तीन आणि नवीन चार अशा एकुण ७ ‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’ महानगरपालिकेकडे उपलब्ध झालेल्या आहेत.याशिवाय नागपूर महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे सहा ‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’ ची मागणी सुध्दा केलेली आहे.
‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’मुळे स्वच्छताकार्य केल्याने स्वच्छतेच्या दर्जा सुधारतो. सदर मशीनमध्ये पाण्याचा फवारा असल्याने रस्ता स्वच्छता दरम्यान धुळीचे कण हवेत न उडल्याने हवेतील प्रदुषण कमी होते. शहरातील कमी रुंदीचे उड्डाणपुलांची सफाई मनुष्यबळांमार्फत करतांना होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. या मशीनमध्ये देण्यात आलेल्या ‘हाय सक्शन हास पाईप’च्या मदतीने रस्ते सफाई करताना रस्त्यालगत जमा करण्यात आलेले कचऱ्यांचे ढिगारे तसेच नागरीकांमार्फत टाकण्यात येणारे कचऱ्याची ढिगारे मनुष्यबळाचा वापर व हाताळणी न करता मशीनद्वारे सहजरीत्या उचलणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे कमी वेळात अधिक रस्ता सफाई करणे शक्य होणार आहे.
लोकार्पण प्रसंगी स्वच्छता विभागाचे श्री. लोकेश बासनवार, श्री. रोहिदास राठोड यांच्यासह सर्व झोनल अधिकारी उपस्थित होते.
‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’ ची वैशिष्टे
चेसिसचा प्रकार: १६ टन.
चेसिस इंजिन पॉवर बीएचपी: १६० एचपी.
ऑक्झिलरी डिझेल इंजिन पॉवर: १५५ एचपी.
ऑक्झिलरी डिझेल इंजिनमध्ये सिलिंडरची संख्या: ६.
ब्लोअर स्पीड (RPM): किमान ३१३६ RPM.
ब्लोअर रेटिंग (m³/किमान): 320 m³/किमान.
सक्शन होज किमान ६ मीटर: ४.२ मीटर चाकांवर ट्रॉलीसह.