नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (26) रोजी शोध पथकाने 60 प्रकरणांची नोंद करून रु.58,700/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 37 प्रकरणांची नोंद करून रु.14,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून रु.100/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून रु.2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून रु.13,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे व साठवणे टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून रु.1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 29 प्रकरणांची नोंद करून रु.5,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 06 प्रकरणांची नोंद करून रु.6,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. हरित लवाद यांनी दिलेल्या दि. 03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 10,000/- रुपयांची वसुली करण्यात आली.ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत मे. आंबुलकर सुपर म्लटीस्पेशलिटी हॉस्पीटल यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. आणी मे. भारत नर्सरी यांनी झाडाचे रोपवाटिका आणि चिखल फूटपाथवर टाकल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत मे. एंजल डेव्लपर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला व मे. लेक्षा हाऊस कॅफे यांनी वसतिगृहांमध्ये अन्नपदार्थ टाकून चेंबर लाईनमध्ये अडथळा आणणे आणि हरित न्यायाधिकरण कायद्या अंतर्गत रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. गांधी बाग झोन अंतर्गत मे.तिरूपती ईनफ्रास्ट्र्क्चर यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला व मे. श्याम किराणा स्टोअर यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.
सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. शाहु स्वीट्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. आशी नगर झोन अंतर्गत मे. ओईसीस यांनी बांधकामादरम्यान सेव्हर लाईनला झालेले नुकसान केल्याबद्दल रु.20,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. अवंतीका हाईट्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 09 प्रकरणांची नोंद करून रू. 85,000/- दंड वसूल केला.