भारतीय संसदेद्वारा आयोजित राष्ट्रीय परिषदेत
माजी महापौर दयाशंकर तिवारी व नंदा जिचकार सहभागी
Date : 04 Jul 2025
या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत देशभरातील विविध शहरातील महापौर आणि उपमहापौर सहभागी झाले होते. या राष्ट्रीय परिषद मध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री श्री. नायब सिंग तसेच मध्यप्रदेशचे मंत्री श्री. कैलास विजयवर्गीय प्रामुख्याने उपस्थित होते.
भारतीय संसदेतर्फे पहिल्यांदा या प्रकारची राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील ४० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. या राष्ट्रीय परिषदेत विविध विषयांवर परिसंवाद झाले.
या परिषदेतील एका परिसंवादात सहभाग घेताना माजी महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी या परिषदांमधून लोकशाहीसोबतच देशातील स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत होण्यास चालना मिळणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व महानगरपालिकांच्या बैठकीमध्ये प्रश्ननोत्तरे होत असल्याची माहिती यावेळी दिली. लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिरला यांनी महानगरपालिकांच्या बैठकीमध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याची सूचना केली होती. महानगरपालिकांच्या बैठकांमध्ये प्रश्नोत्तरे होत असल्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यास मदत होत असल्याचे श्री. दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सांगितले.