नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. (ता.08) मंगळवार रोजी शोध पथकाने 22 प्रकरणांची नोंद करून 26,200/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 200/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून रू. 800/- चे दंड वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करून 14,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यावसायिकाने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 06 प्रकरणांची नोंद करून 1,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून रु. 4,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत मे. किरणापुरे किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. एम.एम. स्विट्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत लक्ष्मण थोटे यांनी मोकळया जागेवर मोठया प्रमाणात कचरा व अस्वच्छ स्थिती आढळल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसूल करण्यात आले. आशीनगर झोन अंतर्गत मे. अजम पब्लीक स्कुल यांनी विद्युत खांबावर विनापरवानगी फलक लावल्याबद्यल रू.5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. परफेक्ट हाईट्स अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. तसेच मे. भगवान डेअरी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 06 प्रकरणांची नोंद करून रू. 35,000/- दंड वसूल केला.