३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन कर भरणाऱ्यांना मिळणार १० टक्के सूट
Date : 08 Jul 2025
नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या नेतृत्वात व उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम यांच्या देखरेखीत १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ या काळात ऑनलाईन कर भरणाऱ्यांना १५ टक्के सवलत देण्यात आली. तर ऑफलाईन मालमत्ता कर अदा करणाऱ्या करदात्यांना १० टक्के सवलत देण्यात आली. या अभियानामुळे महानगरपालिकेच्या कर वसुलीमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही सवलत शिक्षण कर, रोजगार हमी कर आणि मोठ्या निवासी इमारतीवरील कर यावर लागू होणार नाही.
करदात्यांनी दिलेल्या प्रतिसाद पाहून महानगरपालिकेने आता ही कर सवलत येत्या ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यात ऑनलाईन कर अदा करणाऱ्या करदात्यांना १० टक्के सवलतीचा लाभ होणार आहे. करदात्यांनी महानरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या सवलतीचा लाभ घ्यावा, तसेच करदाते व्हाट्सअॅप चॅटबॉटद्वारे ७३९७८०७३९७ या मोबाईल क्रमांकाचा उपयोग कर भरण्यासाठी केला जाऊ शकतो.