मनपात अभियंत्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
आपत्कालीन व्यवस्थापनेत अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची: डॉ. हरी कुमार
Date : 16 Sep 2025
या दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यमान स्थानिक धोके, शहरातील सध्यस्थितीतील धोके, मास्टर प्लॅन, बांधकाम संहिता, सर्वोत्तम बांधकाम पद्धती आणि शहर-विशिष्ट सुरक्षा मॅन्युअल यांचा आढावा घेऊन शहरानुसार प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करणे, ज्यात गृहनिर्माण आणि जीवनरेषा संरचनांसाठी सुरक्षा, लवचीकता आणि टिकाऊपणा या बाबींचा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी जीओ हजार्ड सोसायटीचे विभागीय संचालक डॉ. हरी कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ. हरी कुमार यांनी सांगितले की, देशात भूकंप, चक्रीवादळ, ढग फुटी, पूर, ढगांचा गडगडाट, भुस्खलन अशा अनेक समस्या आहेत. भारत या समस्यांना सतत समोर जात असतो. अशावेळी या समस्या लक्षात घेऊन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे मानांकन लक्षात घेऊन उपाययोजना व पूर्वनियोजन केले तर जीवित हानी व इतर नुकसान कमी होऊ शकते. यावेळी डॉ. हरी कुमार यांनी जपान, नेपाळ, अमेरिका व इतर देशासह भारतातील विविध राज्यात आलेल्या आपत्तीबाबत माहिती देत आपत्कालीन परिस्थिती नियोजन कसे असावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
याकरिता ज्या ठिकाणी आपण इमारतीचे बांधकाम करतो अशा ठिकाणी त्या ठिकाणच्या जमीनीची तपासणी, अभियंता, आर्किटेक्चर व प्लॅनरची यांची मदत घेऊन कायदेशीर बांधकाम केले तर बरेच आपत्कालीन संकट टाळता येते. इमारतीचा पाया मजबूत ठेवला किंवा इमारतीची क्षमता वाढवली तर संकटांचा आपण योग्यरित्या सामना करू शकतो.
भारतात भूकंपाचे पूर्वी पाच झोन होते असे सांगत त्यांनी ओडिसा राज्यात चक्रीवादळ आले तर अशा संकटाचा सामना करण्यासाठी चक्रीवादळ,आश्रयस्थळ तयार करण्यात आले, त्यामुळे अनेकांचे जीव वाचला. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाकरिता दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज असल्याचेही डॉ. हरी कुमार सांगितले.
यावेळी जीओ हजार्ड सोसायटीचे श्री. प्रणव सेठी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे अनेकदा इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे इमारतीचे बांधकाम करताना आग लागली तरी आगीचा धूर बाहेर निघण्यासाठी किंवा धूर घरात पसरू नये यासाठी इमारतीची रचना तशी पद्धतीची करणे गरजचे आहे, त्यातही लोकांचे जीव वाचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याकरीता लोकांना माहिती असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. " >
मंगळवारपासून (ता.१६) कार्यशाळेला प्रारंभ झाला. याप्रसंगी जीओ हजार्ड सोसायटीचे विभागीय संचालक डॉ. हरी कुमार, मनपाचे कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर, श्री. मनोज गद्रे, श्री. महेश गेडाम, श्री. अनिल गेडाम, श्री. विजय गुरूबक्षाणी, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, उपअभियंता श्री. राजीव गौतम आणि अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, यूएनडीपीच्या समन्वय श्रीमती आरुषा आनंद, जीओ हजार्ड सोसायटीचे श्री. प्रणव सेठी, श्रीमती अल्पना खंडारे आदी उपस्थित होते.
या दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यमान स्थानिक धोके, शहरातील सध्यस्थितीतील धोके, मास्टर प्लॅन, बांधकाम संहिता, सर्वोत्तम बांधकाम पद्धती आणि शहर-विशिष्ट सुरक्षा मॅन्युअल यांचा आढावा घेऊन शहरानुसार प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करणे, ज्यात गृहनिर्माण आणि जीवनरेषा संरचनांसाठी सुरक्षा, लवचीकता आणि टिकाऊपणा या बाबींचा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी जीओ हजार्ड सोसायटीचे विभागीय संचालक डॉ. हरी कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ. हरी कुमार यांनी सांगितले की, देशात भूकंप, चक्रीवादळ, ढग फुटी, पूर, ढगांचा गडगडाट, भुस्खलन अशा अनेक समस्या आहेत. भारत या समस्यांना सतत समोर जात असतो. अशावेळी या समस्या लक्षात घेऊन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे मानांकन लक्षात घेऊन उपाययोजना व पूर्वनियोजन केले तर जीवित हानी व इतर नुकसान कमी होऊ शकते. यावेळी डॉ. हरी कुमार यांनी जपान, नेपाळ, अमेरिका व इतर देशासह भारतातील विविध राज्यात आलेल्या आपत्तीबाबत माहिती देत आपत्कालीन परिस्थिती नियोजन कसे असावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
याकरिता ज्या ठिकाणी आपण इमारतीचे बांधकाम करतो अशा ठिकाणी त्या ठिकाणच्या जमीनीची तपासणी, अभियंता, आर्किटेक्चर व प्लॅनरची यांची मदत घेऊन कायदेशीर बांधकाम केले तर बरेच आपत्कालीन संकट टाळता येते. इमारतीचा पाया मजबूत ठेवला किंवा इमारतीची क्षमता वाढवली तर संकटांचा आपण योग्यरित्या सामना करू शकतो.
भारतात भूकंपाचे पूर्वी पाच झोन होते असे सांगत त्यांनी ओडिसा राज्यात चक्रीवादळ आले तर अशा संकटाचा सामना करण्यासाठी चक्रीवादळ,आश्रयस्थळ तयार करण्यात आले, त्यामुळे अनेकांचे जीव वाचला. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाकरिता दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज असल्याचेही डॉ. हरी कुमार सांगितले.
यावेळी जीओ हजार्ड सोसायटीचे श्री. प्रणव सेठी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे अनेकदा इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे इमारतीचे बांधकाम करताना आग लागली तरी आगीचा धूर बाहेर निघण्यासाठी किंवा धूर घरात पसरू नये यासाठी इमारतीची रचना तशी पद्धतीची करणे गरजचे आहे, त्यातही लोकांचे जीव वाचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याकरीता लोकांना माहिती असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.