मनपा आयुक्तांच्या हस्ते 'स्वच्छता ही सेवा' अभियानाला प्रारंभ
मनपाद्वारे '७२ तास स्वच्छता’ उपक्रम
Date : 17 Sep 2025
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात अभियानाचा भाग असलेल्या '७२ तास स्वच्छता' उपक्रमाला मनपा आयुक्तांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त श्री. राजेश भगत यांच्यासह स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, या उपक्रमा अंतर्गत १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत शहराच्या दहाही झोनमधील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. याकरिता घनकचरा विभागातील स्वच्छता दुतांची विशेष पथक गठीत करण्यात आले आहेत.
याशिवाय पंधरवडा कालावधीत 'स्वच्छता ही सेवा २०२५' अंतर्गत मनपाद्वारे ‘एक पेड माँ के नाम, बॅकलेन स्वच्छतेची विशेष मोहीम, विशेष स्वच्छता मोहीम, महिला स्वच्छताकर्मीकरिता विशेष आरोग्य शिबीर व आरोग्यविषयक काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित केले जाणार आहे. तसेच स्वच्छ, सुंदर,हरित नागपूर महोत्सव, एक दिवस,एक तास, एक साथ उपक्रम, स्वच्छता रॅली आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.