लकडगंज झोन मधील १९३ मालमत्तावर होणार जप्ती कारवाई
Date : 17 Sep 2025
नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज झोन अंतर्गत स्थावर मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर आता कठोर कारवाई सुरू झाली आहे. झोनमधील १९३ स्थावर मालमत्तांवर सुमारे ६३ लाख ६३ हजार ६४५ रुपये मालमत्ता कर थकल्यामुळे त्या जप्त करण्यात आली आहे. यामध्ये मौजा पुनापूर, मौजा भरतवाडा येथील मालमत्तांचा समावेश आहे. येत्या ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मालमत्तेचा थकीत कराचा भरणा करीत लिलाव टाळावा. अशी माहिती लकडगंज झोनचे सहायक आयुक्त श्री. विजय थुल यांनी दिली.
Back To Home Page
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मालमत्तेचा थकीत कराचा भरणा न करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या अनुसुची ‘ड’ प्रकरण 8 च्या नियम 45 पोटनियम (1) अन्वंये जाहीर लिलाव (नमुना अ) कार्यवाही लिलाव करुन बकाया कर वसुल करण्यात येईल. ही कार्यवाही मनपाचे उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम यांच्या निर्देशानुसार झोनचे सहा. आयुक्त श्री. विजय थुल यांच्या मार्गदर्शनात अधिक्षक श्री. रोशन अहिरे, कर निरीक्षक श्री भुषण मोटघरे, श्री मनिष तायवाडे, श्री लालअप्पा खान , श्री. सागर बालपांडे, श्री राज साम्रतलवार करण्यात आली आहे.