मनपातर्फे प्रबोधनकार ठाकरे यांना विनम्र अभिवादन
Date : 17 Sep 2025
थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य नेते, सामाजिक लढ्याचे नेतृत्त्व करणारे केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
Back To Home Page
नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मनपाचे उपायुक्त श्री. राजेश भगत, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. अमोल तपासे, श्री. प्रवीण वानखेडे, श्री. प्रमोद हिवसे, श्री. समीर गौतम, श्रीमती रसिका पालकर यांच्या सह इतर कर्मचारी उपस्थित होते.