मनपाच्या 'हेल्दी स्ट्रीट्स' धोरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
१३०० हून अधिक नागरिकांनी सर्वेक्षणात घेतला भाग
Date : 18 Sep 2025
याचाच एक भाग म्हणून हेल्दी स्ट्रीट धोरण तयार केले जात आहे. या धोरणामध्ये पदपथ , सुरक्षित सायकलसाठी सुविधा, सुरक्षित चौक आणि चालणे, सायकलने प्रवास करणे व सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणारे रस्ते विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. याकरिता केल्या जात असलेल्या सर्वेक्षणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केवळ दोन आठवड्यांत १३०० हून अधिक नागरिकांनी या सर्वेक्षणात भाग घेऊन नागपूरच्या रस्त्यांच्या भविष्याबद्दल आपली मते नोंदवली आहेत .
सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या १३०० पैकी ८०० हून अधिक नागरिकांनी ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारेट सहभाग घेतला असून, ५०० नागरिकांनी ऑफलाइन माध्यमांतून भाग घेत मत नोंदविले आहे. येत्या २५ सप्टेंबरपर्यंत सुरू असलेल्या या सर्वेक्षणात नागरिक नागपुरात प्रवासासाठी कोणत्या मार्गांचा वापर करतात, त्यांना कोणत्या अडचणी येतात आणि रस्त्यांच्या सुधारणेसाठी त्यांना काय बदल अपेक्षित आहेत, याबद्दल माहिती देऊ शकतात नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन हे धोरण तयार करण्यासाठी एनएमसीला आयटीडीपी इंडिया तांत्रिक सहाय्य करत आहे
या धोरणाची गरज का आहे?
गेल्या दशकात नागपूरमध्ये खाजगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी, असुरक्षित परिस्थिती आणि पादचारी, सायकलस्वार, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी धोके वाढले आहेत. आयटीडीपी इंडिया'ने केलेल्या 'नागपूर अर्बन स्ट्रीट इम्पॅक्ट असेसमेंट' या अलीकडील अभ्यासात मुख्य रस्त्यांवर वाहनांचा वेग ५० किमी प्रति तास पेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.
'हेल्दी स्ट्रीट्स' कार्यक्रम काय आहे?
या आव्हानांवर मात करण्यासाठी मनपाने 'आयटीडीपी इंडिया'च्या तांत्रिक मदतीने 'नागपूर हेल्दी स्ट्रीट्स' कार्यक्रम सुरू केला आहे.हा एक दीर्घकालीन उपक्रम असून, त्याचा उद्देश सर्वांसाठी सुरक्षित, अधिक समावेशक आणि सुलभ रस्ते निर्माण करणे आहे या कार्यक्रमाचा भाग म्हणून, 'हेल्दी स्ट्रीट्स' धोरण तयार केले जात आहे, जे रस्त्यांच्या डिझाइनसाठी शिफारसी देईल आणि सुरक्षित व समावेशक फूटपाथ, वाहतूक नियंत्रणाचे उपाय, सुरक्षित जंक्शन आणि सायकलिंगसाठी उत्तम पायाभूत सुविधा यांसारख्या सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल हे धोरण नागपुरातील रस्ते संबंधित विविध संस्थांमध्ये समन्वयासाठी एक एकीकृत चौकट म्हणून काम करेल.