मनपाच्या एक तारीख, एक तास, एक साथ’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Date : 01 Nov 2025
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या नेतृत्वात दहाही झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या मार्फत शनिवारी (ता.१) मनपाच्या दहाही झोनमध्ये विविध ठिकाणी ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत शहरातील दहा झोनमधील विविध ठिकाणी नागरिकांच्या मदतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या अभियानाअंतर्गत लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक १६ मधील राहुल नगर उर्वेला कॉलोनी, धरमपेठ झोनमधील प्रभाग क्रमांक १२ मधील गंगा नगर मार्केट, हनुमान नगर झोन मधील प्रभाग क्रमांक ३१ मधील शिव बिरहा जुनी शुक्रवारी, धंतोली झोन मधील प्रभाग क्रमांक १७ मधील भुरा मैदान हाजरी स्टँड, नेहरूनगर झोन मधील प्रभाग क्रमांक २६ मधील विरंगुळा केंद्र दर्शन कॉलोनी, गांधीबाग झोन मधील प्रभाग क्रमांक १८ मधील काशीबाई देऊळ, सतरंजीपुरा झोन मधील प्रभाग क्रमांक २१ चाळीस संडास, लकडगंज झोन मधील प्रभाग क्रमांक २५ मधील भवानी मंदिर मारवल गेट ते शांती ट्रेडर्स, आशीनगर झोन मधील प्रभाग ७ मधील आवळे बाबू चौक, मंगळवारी झोन मधील प्रभाग १० सीआयडी नाला जवळ मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. अभियानात सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, बाजार परिसर आणि आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करण्यात आली.