मनपाच्या कचरा संकलन ताफ्यात २० नवीन ई-वाहनांचा समावेश
आयुक्तांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण
Date : 03 Nov 2025
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले,'एजी एन्व्हायरों'चे अध्यक्ष श्री. महेंद्र अनंथुला, पश्चिम विभाग प्रमुख श्री. बिजू थॉमस, प्रकल्प प्रमुख श्री. समीर टोणपे आणि ऑपरेशन व्यवस्थापक श्री. प्रवीण चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
एजी एन्व्हायरो एजन्सीद्वारे शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली आणि नेहरू नगर झोनमध्ये कचरा संकलित केला जातो. नव्याने समावेश करण्यात आलेल्या या २० ई-वाहनांचा उपयोग घराघरातून निघणारा ओला-कोरडा वर्गीकृत कचरा योग्यप्रकारे आणि कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी होणार आहे. पर्यावरणपूरक असल्याने ही वाहने कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करतील आणि घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया अधिक शाश्वत करण्यावर भर देतील.