रुपचंद जाधव चौकातील वाहतूक सुरळीत होणार
आमदार, आयुक्त व पोलीस उपायुक्ताची संयुक्त पाहणी
Date : 06 Nov 2025
याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, धंतोली झोनचे सहायक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडे, कार्यकारी अभियंता श्री. रविंद्र बुंधाडे, श्री. अनिल गेडाम, श्री. राजेंद्र राठोड, उपअभियंता श्री. राहुल देशमुख आणि माजी नगरसेवक श्री. प्रमोद चिखले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. संजय मेंढे, पोलीस निरीक्षण श्री.सुहास राऊत आदी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेद्वारे रुपचंद जाधव चौक हा इंडियन रोड कॉंग्रेसच्या मार्गदर्शक तत्वांनुसार विकसित केला जात आहे, ज्यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना होणारा त्रास टळेल. यावेळी आयुक्तांनी चौकातील अतिक्रमण त्वरित हटविण्याचे निर्देश दिले. तसेच वाहतूक पोलिसांकडून ऑटो आणि ई-रिक्षावर नियमन व कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एस.टी. स्टँड चौक) प्रशासन बसच्या आगमन आणि निर्गमन मार्गामध्ये आवश्यक ते बदल करणार आहे. सध्या बस स्थानकावर बसेस ये-जा करताना वाहतुकीत अडथळा निर्माण होत, असल्यामुळे या बदलांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी आमदार श्री. प्रवीण दटके यांनी सांगितले की, पोलिसांच्या मते या चौकातील गोलाकार चबुतराचा (रोटरीचा) व्यास आकाराने मोठा असल्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. या गोलाकार चबुतराचा (रोटरीचा) व्यास कमी केल्यास वाहतूक आणखी सुरळीत होईल, असे श्री. दटके यांनी सुचविले. त्यावर आयुक्तांनी स्पष्ट केले की, गोलाकार चबुतरा (रोटरीचा) हा इंडियन रोड कॉंग्रेसच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच तयार करण्यात आला आहे. मात्र, पुढील एका महिन्यात निरीक्षण करून वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेत, आवश्यक ते बदल करण्यात येतील. तसेच आयुक्तांनी अतिक्रमण हटविणे आणि ऑटो-ई रिक्षांसाठी असणाऱ्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. तसेच मार्ग अधिक रुंद झाल्याने बस वाहतुकीत अडथळा येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.