मनपाच्या दहावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्येकी ५० हजार रुपये
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली मंजूरी
Date : 06 Nov 2025
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, शाळेतील वातावरण अभ्यासाला पूरक व आनंददायी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्याकरिता मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या नेतृत्वात, समाज विकास उपायुक्त डॉ. रंजना लाडे आणि शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांच्यातर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी माध्यमांच्या एकूण २८ माध्यमिक शाळा आहेत. मार्च २०२५ मध्ये झालेल्या शालांत माध्यमिक परीक्षेमध्ये महानगरपालिकेच्या शाळांच्या निकालाची टक्केवारी ९०.२८ एवढी होती. पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला ९४ टक्के गुण मिळाले आहे. मनपाच्या शाळांचा नावलौकिक होत असल्याने मनपाच्या शाळांमधून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरीता आर्थिक मदत करण्याचे आश्वासन गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मनपा आयुक्तांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करताना महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून गुणवत्ताप्राप्त ५० विद्यार्थ्यांना ११ वी व १२ वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
या शिवाय मनपा शाळेत मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे याकरीता मुलींना ४ हजार रुपये वार्षिक उपस्थिती भत्ता दिला जात आहे. खाजगी शाळांच्या तुलतेन विद्यार्थी मागे राहू नये याकरिता मनपातर्फे विविध उपक्रम राबवून गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जात आहे. संगणक प्रशिक्षण, शिक्षण महोत्सव आणि क्रीडा महोत्सवच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांचा विकास केला जात आहे. शिवाय आता डिजिटल बोर्ड माध्यमातून शिक्षण, कम्प्युटर लॅब, सायन्स लॅबच्या माध्यमातून विविध प्रयोगाच्या करीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. याचबरोबर मनपातर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्र तज्ज्ञ, अशा समुपदेशकांमार्फत मार्गदर्शन सुद्धा दिले जात असल्याने इतर खाजगी शाळांच्या स्पर्धेत मनपा शाळांनी एक पाऊल समोर टाकले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा, पीएम श्री शाळा, मिशन नवचेतना, द हॅप्पी स्कूल प्रोजेक्टर, स्मार्ट सिटीच्या योजनामुळे मनपा शाळेत गुणवत्ता वाढ झाली आहे.
सध्या मनपातर्फे दहावीचे शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये मराठी- ७, हिंदी-११, उर्दू- ९ आणि इंग्रजी- १ अशा एकूण २८ शाळा आहेत. यातील ११ शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळत आहे. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिकताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मोठी मदत मिळणार आहे.