‘पौर्णिमा दिनानिमित्त आग्याराम देवी चौक येथे जनजागृती
Date : 06 Nov 2025
माजी आमदार तथा मनपाचे माजी महापौर प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानाद्वारे शहराच्या विविध भागांमध्ये पौर्णिमेच्या रात्री अनावश्यक विद्युत दिवे एक तासासाठी बंद ठेवून ऊर्जा बचतीचा संदेश देण्यात येतो. या अभियानाला व्यापारी आणि नागरिकांनी उदंड प्रतिसाद दर्शवित आहेत. याप्रसंगी स्वच्छ भारत नागपूरचे ब्रँड अँबेसिडर व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे श्री. कौस्तव चॅटर्जी, मनपाचे कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड, श्री दिलीप वंजारी यांच्या सह ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कु. सुरभी जयस्वाल, श्री. मेहुल कोसुरकर, श्री. बिष्णुदेव यादव, कु. प्रिया यादव, कु.श्रीया जोगे, श्री. पिनाकी बानिक, श्री.पार्थ जुमडे, कु.जान्हवी पारसकर यांच्यासह यांनी जनजागृती केली.
ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी व्यापारी बांधवांना एक तास विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला आग्याराम देवी चौक परिसरातील व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मनपा आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या संयुक्त प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी आणि ऊर्जा बचतीविषयी जागरूकता वाढत आहे. स्थानिक नागरिकांनीही या अभियानात उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले आहे.