सेल्फी काढत तरुणाईने केली मतदार जनजागृती
आयुक्तांनी काढली सेल्फी: मतदान करण्याचे केले आवाहन स्वीप अंतर्गत मनपाची मतदान जनजागृती
Date : 01 Jan 2026
आयुक्तांनी सर्व मतदारांना यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, मतदारांसाठी त्यांचे मतदान कुठे आहे आणि मतदान केंद्र क्रमांक कोणता आहे, यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळ वर भेट देऊन माहिती प्राप्त करून घ्यावी, फुटाळा तालावाच्या परिसरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. नागरिकांनी सेल्फी पॉईंटवर स्वत:चे आणि आपल्या मित्रांचे, परिवाराचे सेल्फी काढले.
मनपा सार्वत्रिक निवडणुकीत तरुणाईसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती वाढावी, आणि लोकशाही पर्वात सहभाग वाढावा याकरिता रेशीमबाग चौक (मध्य नागपूर), आंबेडकर उद्यान (पूर्व नागपूर), विवेकानंद स्मारक (दक्षिण-पश्चिम नागपूर), फुटाळा तलाव (पश्चिम नागपूर), झुलेलाल पार्क (उत्तर नागपूर), गांधीबाग उद्यान (मध्य नागपूर) येथे हे सेल्फी पॉईंट तयार करण्यात येत आहे. मतदारांनी या आकर्षक सेल्फी पॉईंटला भेट देऊन आपले फोटो काढावेत आणि ते फोटो सोशल मीडियावर शेअर करताना नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलला @nmcngp टॅग करा असे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले आहे.
नागपूर शहरात येत्या १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून, या लोकशाहीच्या पर्वात मोठ्या संख्येने मतदारांनी आपला सहभाग नोंदवावा यासाठी मनपाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. डॉ. लाडे यांनी सांगितले की, १३ जानेवारीपर्यंत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यात सेल्फी पॉईंट, मतदान अधिकार रथ, कॅम्पस कनेक्ट प्रोग्राम, वॉक विथ व्होटर, मतदार जागरुकता बाईक रॅली, मानवी साखळी व मकर संक्रांतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी बलून फेस्टीवलचे आयोजित करून मतदारांमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहे.
याप्रसंगी नागपूर महानगरपालिकेद्वारा सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी नाताळ सणाचे औचित्य साधून शहरातील ४० ठिकाणी सांताक्लॉजच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबविला होता.