पहिल्याच दिवशी नागरिकांचा ‘पुष्पोत्सव २०२५’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुष्पोत्सवाची दहा उद्यानात थाटात सुरु : नागरिकांना शंभरावर प्रजातींची फुले पाहण्याची अनोखी संधी
Date : 01 Jan 2026
शहरातील दहाही झोन अंतर्गत विविध उद्यानांमध्ये ४ जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. दहाही झोन मधील ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनासाठी उद्याने पुष्पांनी आणि सौंदर्यीकरणानी सजविण्यात आलेल्या उद्यानांना भेट द्या, सुंदर पुष्पांनी तयार केलेल्या कलाकृती पहा, सेल्फी पॉईंट्स वर फोटो काढा, आणि निसर्गाचा आनंद लुटा असे मनपा आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले. विशेष म्हणजे उद्यानांत ‘वेस्ट टू वंडर’ या संकल्पनेवर आधारित सजावट, पुनर्वापरयोग्य साहित्यचा वापर करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे दिला गेला आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या नेतृत्वात उद्यान संवर्धक श्री. अमोल चौरपगार यांच्यासह संपूर्ण उद्यान विभाग पुष्पोत्सव २०२६ साठी तत्परतेने कार्यरत आहे. मनपाच्या विद्युत विभागाद्वारे दहाही उद्याने आकर्षक रोषणाईने उजळण्यात आली आहे. पुष्पोत्सव प्रदर्शनात झेंडू, पिटोनिया, डायनथस, देहेलिया, गुलाब, जर्बेरा, कॅलेंडुला, प्लँटेला, झिनिया शेवंती, अँटीरियम, पाम, अरेलिया, युकोरबिया, डेसिना, जत्रोफा, पेंटास, गुलाब, बिगोनिया यासारखे १०० हून अधिक सीजनल व पेरॅनियल फुलांचे प्रकार व विभिन्न प्रजातींची फुले, एकाच ठिकाणी प्रत्यक्ष पहायला मिळत आहेत. याशिवाय फुलांच्या आकर्षक पुष्परचना देखील लक्ष वेधून घेत आहेत. तसेच या पुष्पोत्सवामध्ये टाकाऊ पदार्थांपासून तयार केलेल्या साहित्याचा वापर करून फुलांची व सजावटीची रचना करण्यात येत असून सेल्फी पॉईंट्स, कृत्रिम धबधबाची उभारणी केली आहे.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून उद्यानात पुष्पोत्सव आयोजित करण्यात येत आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुष्पोत्सवा मध्ये नागरिकांना विविध फुलांच्या प्रजातींची माहिती मिळते. त्यामुळे नागरिकांचा उत्साह वाढतो. जास्तीत जास्तीत जास्त नागरिकांनी या पुष्पोत्सवाला भेट देऊन लाभ घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनीही नागपूर महानगरपालिकातर्फे सुंदर अशा पुष्पोत्सवाला सुरुवात झाली असल्याचे सांगत विविध उद्यानातील पुष्पोत्सवाला नागरिकांनी येथे भेट देऊन आनंद आणि लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या उद्यानांमध्ये 'पुष्पोत्सव२०२६
लक्ष्मीनगर झोन -सुर्वेनगर उद्यान, धरमपेठ झोन - शिवाजीनगर उद्यान, हनुमान नगर -त्रिशताब्दी उद्यान, धंतोली झोन - महात्मा फुले उद्यान, नेहरू नगर झोन - संत ज्ञानेश्वर उद्यान, गांधी महाल झोन झोन - गांधीबाग उद्यान, सतरंजीपुरा झोन - तुळशीनगर उद्यान, लकडगंज झोन - लता मंगेशकर उद्यान, आशी नगर झोन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, मंगळवारी झोन - मंगळवारी उद्यान उद्यान या १० उद्यानांमध्ये नागरिकांना 'पुष्पोत्सव' प्रदर्शनाचा आस्वाद घेता येणार आहे.