सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने स्वीपअंतर्गत महिला मतदार जागृती
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना महापालिकेत अभिवादन
Date : 03 Jan 2026
नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी असलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या स्वीप या कार्यक्रमा अंतर्गत महिला मतदारांना संदेश देणारी आकर्षक रांगोळी काढण्यात आली. रांगोळी कलावंत श्री. संजय कश्यप व श्रीमती अनिता कश्यप यांनी सावित्रीबाई फुले यांचे चित्र असणारी रांगोळी साकारली. तर मनपाच्या संजयनगर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थीनी कु. शिवानी वर्मा, कु. वैष्णवी शाहू यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांची वेशभूषा साकारत स्त्रीशिक्षण,समता व सामाजिक जागृतीचा संदेश दिला. महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांचे मार्गदर्शनात तसेच संजय नगर माध्यमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती शशिकला चोंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला.
आद्य शिक्षिका,मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे अभिवादन करण्यात आले. मनपाच्या उपायुक्त तथा स्वीप अधिकारी डॉ.रंजना लाडे, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, जनसंपर्क अधिकारी श्री.मनीष सोनी उप शिक्षणाधिकारी श्रीमती सीमा खोब्रागडे यांच्यासह श्री.अमोल तपासे, श्रीमती नूतन मोरे, श्री.विनीत टेम्भूर्णे यांच्यासह इतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.