आयुक्तांनी केली शासकीय मुद्रणालयात मतपत्रांची पाहणी
Date : 04 Jan 2026
नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीनवर लावण्यासाठी मतपत्रांची छपाई नागपुरातील शासकीय मुद्रणालय येथे केली जात असून, या ठिकाणी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी रविवारी (ता.०४) सकाळी भेट दिली.
Back To Home Page
नागपूर महानगरपालिकेच्या ३८ प्रभागातील १५१ जागेसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, निवडणुकीसाठी ९९२ उमेदवार रिंगणात आहे. मनपाच्या झोन निहाय प्रत्येक प्रभागासाठी मतपत्रांची छपाई होत आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. चौधरी यांनी शासकीय मुद्रणालय येथे भेटी दरम्यान अधिकाऱ्यांशी चर्चा करीत संबधित कामासंदर्भात निर्देश देखील दिले.
प्रसंगी मनपा उपायुक्त आणि निवडणूक प्रमुख श्री निर्भय जैन, सहायक आयुक्त श्री श्याम कापसे, कार्यकारी अभियंता श्री मनोज सिंग, निवडणूकनिर्णय अधिकारी श्रीमती इंदिरा चौधरी, श्री अमोल कुंभार, सहायक आयुक्त श्री राजकुमार मेश्राम आणि शासकीय मुद्रणालयचे सहायक व्यस्थापक श्री विनोद बोंधले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.