रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती
महाविद्यालयीन विद्यार्थींनींनी साकारल्या मनोवेधक रांगोळ्या
Date : 05 Jan 2026
मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या नेतृत्वात स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. रंजना लाडे यांच्या देखरेखीत मतदान जनजागृती केली जात आहे.
प्राचार्य डॉ .देवाशिष भौमिक यांच्या मार्गदर्शनात मतदान जनजागृती रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी. पदवी अभ्यासक्रमातील सोळा विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला. या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने मतदान जागृती विषयी कल्पनेतून रांगोळीतून साकारल्या.
या रांगोळी स्पर्धेत बी.ए. च्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी प्रणाली रामटेके हिने प्रथम क्रमांक पटकाविला. बी. कॉम अंतिम वर्षाच्या कु. पायल सांबरे व कु. अर्चना यादव यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला. प्रोत्साहनपर पारितोषिक बी. ए. द्वितीय वर्षाची कु. अश्विनी ठाकरे पारितोषिक घोषित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संपूर्ण शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले संपूर्ण माहिती आपणास सादर .
या स्पर्धेत कु. सिद्धी मेश्राम, कु. निशा अग्रे, सर्वज्ञ शिंदे, अर्पिता थूल, कु. पूजा राहिले, तनुश्री खंडागळे, कु. ऋतुजा गेडाम, कु. मीनाक्षी भुरे, कु. काजल, कु. हर्षाली संयम, कु. पल्लवी रंगले व कु. शुभांगी चक्रे यांनी सहभाग नोंदविला.