देशभरातील २० मेट्रोपॉलिटन सर्वेलन्स युनिट्सची दोन दिवसीय आढावा बैठक आजपासून
Date : 05 Jan 2026
या राष्ट्रीय बैठकीसाठी नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त (शहर) मा. श्रीमती वसुमना पंत, मा. श्री. सौरभ जैन, सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, मा. सुश्री आशिमा भटनागर, उपसचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, डॉ. रंजन दास, संचालक, एनसीडीसी डॉ. हिमांशू चौहान, अतिरिक्त संचालक, एनसीडीसी डॉ. शुभांगी कुलसंगे, संयुक्त संचालक, एनसीडीसी यांच्यासह मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, केंद्र व राज्य पातळीवरील मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार आहे. तसेच PATH संस्थेचे अधिकारी या बैठकीत समन्वयकाची भूमिका बजावणार आहेत.
या बैठकीत एमएसयुच्या कार्यप्रगतीचा आढावा, अंमलबजावणीतील आव्हाने, तसेच भविष्यातील कार्यक्षमतेसाठी रोडमॅप तयार करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे. राज्य व विविध महत्त्वाच्या भागधारकांमध्ये समन्वय साधून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. बैठकीदरम्यान आयोजित पॅनल चर्चेसाठी एम्स नागपूर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टर व सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहून आपले मार्गदर्शन करणार आहेत. ही बैठक देशातील शहरी भागांमध्ये रोग सर्वेक्षण व त्वरित प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.