मेट्रोपॉलिटन सर्वेलन्स युनिट (MSU) राष्ट्रीय आढावा बैठक नागपुरात संपन्न
Date : 08 Jan 2026
बैठकीदरम्यान देशभरातील 20 MSU च्या कार्यप्रगतीचा आढावा, अंमलबजावणीतील अडचणी, आव्हाने तसेच भविष्यातील प्रभावी कार्यासाठी रोडमॅप तयार करण्यावर सखोल चर्चा करण्यात आली. विविध राज्ये व संबंधित भागधारकांमध्ये समन्वय साधून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. यावेळी बोलताना मा. श्री. सौरभ जैन, सहसचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालययांनी, “शहर केवळ स्मार्ट दिसण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने सक्षम असणे अधिक महत्त्वाचे आहे. आरोग्य विभाग अधिक बळकट करण्यावर भर दिला पाहिजे,” असे मत व्यक्त केले.
बैठकीच्या पहिल्या सत्रात नागपूर महानगरपालिका अंतर्गत जानेवारी २०२५ पासून कार्यरत MSU नागपूर च्या “सर्वोत्तम कार्यपद्धतीं” वर प्रकाश टाकणाऱ्या छायाचित्रांची मालिका चे संच तयार करून प्रकाशित “कॉफी टेबल बुक” चे अनावरण प्रमुख पाहुणे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव श्री सौरभ जैन यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नागरी आरोग्य सुरक्षेसाठी परिणामकारक उपाययोजना आणि पुढील दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली.
तांत्रिक सत्रामध्ये माहे सप्टेंबर २०२५ मध्ये दुषित खोकल्याचे औषध मुळे छिंदवाडा येथे झालेल्या उद्रेकादरम्यान MSU नागपूर ने जलद तपासणी आणि प्रतिसाद दिल्यामुळे कसे अनेक बालकांचे मृत्यू होण्यापासून वाचविण्यात आले त्या कार्यपद्धितीवर नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सादरीकरण केले.
बैठकीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पॅनल चर्चेमध्ये NCDC चे डॉ. हिमांशू चव्हान, जागतिक बँक चे श्री गुरु राजेश जैमी, PATH चे डॉ. टीकेश भिसेन, ICMR चे डॉ. प्रज्ञा यादव, पशु संवर्धन विभाग चे श्री अभय भालेराव, गोरेवाडा वन्यजीव चे डॉ. शतानीक भागवत, शासकीय पशु महाविद्यालय चे डॉ. संदीप चौधरी, MSU नागपूर चे डॉ. दीपक सेलोकर, भारतीय वैद्यकीय संगठन चे डॉ. मंजुषा गिरी, व इतर संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला असून पायाभूत सुविधा, नागरी आरोग्य संस्था बळकटीकरण करण्यातील आव्हाने, मानवी तसेच वन्यजीव यांच्यातील परस्परसंवाद आणि त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सहभागींना सर्व-धोकादायक तयारी चौकटीची माहिती देण्यात आली आणि सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी आणि समन्वित प्रतिसाद यंत्रणा मजबूत करण्यासाठी शहर आपत्कालीन प्रतिसाद योजना (सर्व-धोकादायक योजना) विकसित करण्यास सक्षम करण्यात आले.
बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. दीपक सेलोकार,वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नागपूर महानगरपालिका यांनी सांगितले की, “शहरी सार्वजनिक आरोग्य सर्वेक्षणासाठी आता केवळ कालांतराने देण्यात येणाऱ्या अहवालांवर अवलंबून न राहता वास्तविक-वेळेतील (Real-time) सार्वजनिक आरोग्य बुद्धिमत्ता विकसित करणे अत्यावश्यक बनले आहे. PM-ABHIM अंतर्गत कार्यरत MSU आपल्याला महानगरपालिका प्रणाली, खाजगी आरोग्यसेवा प्रदाते आणि डायग्नॉस्टिक लॅबोरेटरीज यांना एकत्र जोडून एक सशक्त, समन्वयित आणि सहयोगी सर्वेक्षण पर्यावरण निर्माण करण्याची अद्वितीय संधी पुरवतात. ते पुढे म्हणाले,“शहर पातळीवरील प्लॅटफॉर्म म्हणून MSU फक्त डेटा संकलन करणारी यंत्रणा नाही तर त्या निर्णयाधारित प्रणाली आहेत ज्या शहरी भागातील गुंतागुंतीच्या परिस्थितीत रोगांचे लवकर निदान, जलद प्रतिसाद आणि लक्ष्यित सार्वजनिक आरोग्य कृती सुनिश्चित करते.