मनपातर्फे निवडणुकीच्या प्रचारासाठी १९ सभांना परवानगी
Date : 08 Jan 2026
नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीकरिता येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा मुख्यालयातील जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयजवळ उमेदवार व राजकीय पक्षांच्या सोईसाठी ‘केंद्रीय एक खिडकी कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. उमेदवारांच्या प्रचाराकरिता विविध परवानगी सुविधा १३ जानेवारी रोजी सुरू राहणार आहे.
सभा परवानगी कक्षातर्फे आजवर १९ स्टार प्रचारकांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे. स्टार प्रचारकांच्या रॅलींच्या नियोजित परवानग्यांसाठी रॅली परवानगी कक्षातर्फे २ रॅलींना परवागनी देण्यात आली आहे. नागपूर शहरात प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना अधिकृत परवानगीसाठी वाहन परवाना कक्षातर्फे १५ वाहनांना प्रचाराकरिता परवानगी देण्यात आलेले आहे. निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या डिस्प्ले आणि होर्डिग या अधिकृत जाहिरात फलकांसाठी जाहिरात परवाना कक्षातर्फे ५८ डिस्प्ले आणि २५२ होर्डिगला परवागनी देण्यात आले असल्याची माहिती ‘केंद्रीय एक खिडकी’चे प्रमुख श्री. अजय पझारे यांनी दिली.