मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा
Date : 08 Jan 2026
विभागीय आयुक्त कार्यालयातील अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे- चवरे यांनी आज लक्ष्मीनगर व गांधीबाग झोन कार्यालयांना भेटी दिल्या. यावेळी डॉ. खोडे-चवरे यांनी कार्यालयातील सेटअप, स्ट्राँग रूम व या झोनमधील काही मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथे असलेल्या सोई सुविधांचा आढावा घेतला व त्यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्रांना डॉ. माधवी खोडे – चवरे यांनी भेटी दिल्या. अजनीतील रेल्वे सभागृह, रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृह व शंकरनगरातील सरस्वती विद्यालयात हे प्रशिक्षण सुरू आहे. या तिन्ही केंद्रांना डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी भेटी दिल्या. तेथील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्व प्रकारची काळजी घ्यावी, असे निर्देश डॉ. खोडे-चवरे यांनी यावेळी दिले.
यावेळी लक्ष्मीनगर झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी व नागपूर शहराचे उप विभागीय अधिकारी श्री. सुरेश बगळे, तहसिलदार, श्री. अखिलभारत मेश्राम, झोनचे सहायक आयुक्त श्री. धनंजय जाधव व कार्यकारी अभियंता श्री. रविंद्र बुंधाडे उपस्थित होते. तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमान नगर झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी श्री. प्रदिप शेलार यांची, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक श्रीमती रोहिणी पाठराबे, झोनचे सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, कार्यकारी अभियंता श्री.विजय गुरुबक्षानी यांची उपस्थित होते. या झोन मध्ये प्रभाग क्र.२९,३१, ३२,३४ या चार प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याचप्रमाणे गांधीबाग-महाल झोन कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी व नासुप्रचे महाव्यवस्थापक श्री. श्रीराम मुदंडा, तहसीलदार श्री. वैभव पवार, झोनचे सहायक आयुक्त श्री.घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता श्री. गिरीश लिखार उपस्थित होते. या झोन मध्ये प्रभाग क्र. ८, १८,१९,२२ या चार प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे. यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे – चवरे यांचे प्रोटोकॉल ऑफीसर व कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे उपस्थित होते.