सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या २६ प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 27 Jan 2026
मॉल, उपहारगृहे, लाँजिग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून ४००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून ६००० रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून १००० रूपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून १००० रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून १००० रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलाबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून १००० रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून ५००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हॉटेल मध्ये डिसेलडिंग चेंबर नसने, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे,कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी फेकणे अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून ५००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शासकीय भूमिगत नाली वरील चेंबर मध्ये डेबरीज/ साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून ५००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १६ प्रकरणांची नोंद करून ३२०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.पाबले-१९ यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य टाकल्या प्रकरणी रु. १०,००० चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. थ्री बेन्स कॅफे यांच्यावर रस्त्यालगत कचरा टाकल्याप्रकरणी रु. ५००० चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. भारत किराणा स्टोर यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५००० दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. गुरुकृपा स्वीट यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५००० दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत मोहम्मद फर्कुद्दिन यांच्यावर रस्त्यालगत कचरा जाळल्याबद्दल रू. ५००० दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत श्री. हरीश राठोड यांच्यावर नाल्यालगत कचरा टाकल्याबद्दल रू.५००० दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने ०६ प्रकरणांची नोंद करून रू. ३५००० दंड वसुल केला.