२ फेब्रुवारीला स्वीकारलेजातील महापौर, उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र
नवनिर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा ६ फेब्रुवारी
Date : 29 Jan 2026
विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी महापौर, उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याकरिता पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सूचना निर्गमित केली आहे. सूचनेनुसार, सर्व नवनिर्वाचित सदस्यांना शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे होणाऱ्या विशेष सभेला उपस्थित राहण्याचे सूचित केले आहे. विशेष सभेला सुरुवात झाल्यानंतर पीठासीन अधिकारी उमेदवारी अर्जांची छाननी करणार आहे. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांनी सभेला येताना निवडणूक विभागामार्फत देण्यात आलेले सूचनापत्र व निवडून आल्याचे प्रमाणपत्र (झेरॉक्स प्रत) सोबत आणावेत असे आवाहन मनपाच्या निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.