मनपात दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना दिली आदरांजली
Date : 30 Jan 2026
मनपा मुख्यालयात सकाळी ११ वाजता आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून मौन श्रद्धांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तैलचित्राला आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी पुष्पहार अर्पण केला व इतर अधिकाऱ्यांनी पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त श्री. मंगेश खवले, नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. गिरीश गोडबोले, सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, कार्यकारी अभियंता श्री. रविंद्र बुंधाडे, कार्यकारी अभियंता श्री.अनिल गेडाम, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक श्री. ऋतुराज जाधव, सहायक विधी अधिकारी श्री. सुरज परोचे , जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. प्रमोद हिवसे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी देखील आदरांजली वाहिली. याशिवाय दहाही मनपा झोन कार्यालयासह व्हेरायटी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच गांधीसागर चाचा नेहरू बालोद्यान येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन मनपातर्फे आदरांजली वाहण्यात आली.