भाजप व काँग्रेस पक्षाकडून महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल
Date : 02 Feb 2026
नागपूर महानगरपालिकेच्या निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्याकडे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समितीच्या सभागृहात अर्ज दाखल केले. याप्रसंगी सचिवालय विभागाचे अधीक्षक श्री. ताराचंद खंडाते, वरिष्ठ लिपिक श्री. राजेश जामनकर, राजस्व निरिक्षक श्री. विलास धुर्वे, श्री. भूषण शेलार, श्री. मनोज जोशी, श्री. मृणाल बागडे, श्रीमती हीना बोरकर उपस्थित होते.
भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार नगरसेविका (प्रभाग क्र. 28 क) श्रीमती नीता ठाकरे यांनी दोन प्रतींमध्ये अर्ज दाखल केले असून, सूचक म्हणून नरेंद्र (बाल्या) बोरकर व श्रीमती माया इवनाते आहेत तर या अर्जांवर अनुमोदक म्हणून नगरसेविका श्रीमती अश्विनी जिचकार व श्रीमती निरंजना पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत.
त्याचप्रमाणे भाजपच्या उपमहापौरपदाच्या उमेदवार नगरसेविका (प्रभाग क्र. 29 क) श्रीमती लीला हाथीबेड यांनीही दोन उमेदवारी अर्ज दाखल केले असून, यावर सूचक म्हणून नगरसेविका श्रीमती मंगला खेकरे व नगरसेवक श्री. विनोद कन्हेरे यांच्या स्वाक्षरी आहेत, तर अनुमोदक म्हणून नगरसेवक श्री कल्पक भनारकर व नगरसेविका श्रीमती मनीषा अतकरे यांच्या स्वाक्षरी आहेत.
यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष व माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. मोहन मते, माजी आमदार श्री. अनिल सोले, माजी आमदार श्री. गिरीश व्यास, भाजपचे गटनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह अनेक नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
काँग्रसेसकडून स्नेहल ठाकरे
काँग्रेसकडून महापौरपदाच्या उमेदवार म्हणून नगरसेविका (प्रभाग क्र. 11 ब) श्रीमती स्नेहल ठाकरे यांनी निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्याकडे दाखल केला. या अर्जावर सूचक म्हणून नगरसेविका श्रीमती सरस्वती सलामे तर अनुमोदक म्हणून नगरसेविका श्रीमती मंजु चाचेरकर यांची स्वाक्षरी आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून नगरसेवक (प्रभाग क्र. 9 अ) श्री. विवेक निकोसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून नगरसेवक श्री. प्रमोद जोगिंदर सिंग ठाकूर तर अनुमोदक म्हणून नगरसेविका श्रीमती प्रगती यादव यांच्या स्वाक्षरी आहे. यावेळी काँग्रेसचे गटनेते नगरसेवक श्री. संजय महाकाळकर, नगरसेविका श्रीमती सरस्वती सलामे, नगरसेविका श्रीमती मंजु चाचेरकर, नगरसेवक श्री.प्रमोद जोगिंदर सिंह ठाकूर उपस्थित होते.