सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ७६ प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 05 Feb 2026
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता करणे (रु. ४०० दंड) या अंतर्गत १९ प्रकरणांची नोंद करून रू. ७६०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. १०० दंड) या अंतर्गत ३ प्रकरणाची नोंद करून रू. ३०० रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. ४०० दंड) या अंतर्गत ४ प्रकरणाची नोंद करून रू. १६०० रूपयांची वसुली करण्यात आली.
मॉल, उपहारगृहे, लाँजिग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून रू. २००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ७ प्रकरणांची नोंद करून रू.१०५०० रुपयांची वसुली करण्यात आली.
सार्वजनिक रस्ता, फुटपाथ मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून रू.५००० ची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १३ प्रकरणांची नोंद करून रू. २६०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे अष्टविनायक रेसीडेन्सी यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्या प्रकरणी रु.१०,००० चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. अनिवा कन्ट्रक्शन यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्या प्रकरणी रु.१०,००० चे दंड वसुल करण्यात आले. तर धंतोली झोन अंतर्गत मे. शिवालय रेसीडेन्सी यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्या प्रकरणी रु.१०,००० चे दंड वसुल करण्यात आले. नेहरू नगर झोन अंतर्गत मे.अमृत स्वीट भंडार यांच्यावर रस्त्यालगत अस्वच्छता पसरविल्यासह पोचपावित नसल्या प्रकरणी रु.५००० चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. श्याम सुंदर किराणा स्टोर यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापरल्या प्रकरणी रू. ५,००० चा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन मे. कुशवाह किराणा स्टोर यांच्या यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापरकेल्या प्रकरणी रू. ५,००० चा दंड वसूल करण्यात आला. तर मंगळवारी झोन अंतर्गत मे. राघव स्कायलाईन आणि अलंकार रियल इस्टेट प्रा.लि. यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्या प्रकरणी प्रत्येकी रु.१०,००० चे असे एकूण रू. २०००० चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने ८ प्रकरणांची नोंद करून रू. ६५००० दंड वसुल केला.