सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या २८ प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 06 Feb 2026
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता करणे (रु.४०० दंड) या अंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून रू. २४०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. १०० दंड) या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून रू.१०० रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. ४०० दंड) या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून १२०० रूपयांची वसुली करण्यात आली.
मॉल, उपहारगृहे, लाँजिग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून रू.२००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १२ प्रकरणांची नोंद करून रू.८००० रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास ५ प्रकरणांची नोंद करून रू. १००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. शेयर मार्केट क्लासेस यांच्यावर विद्युत खांबावर अनधिकृतरित्या फलक लावण्याप्रकरणी रू. ५,००० चा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. शरद गुप्ता कॉर्नर यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.५००० चा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत मे.जिनीअस करियर पॉईंट यांच्यावर विद्युत खांबावर अनधिकृतरित्या फलक लावल्याप्रकरणी रू. ५,००० चा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने ०३ प्रकरणांची नोंद करून रू. १५००० दंड वसुल केला.