मनपातर्फे पं. दीनदयाल उपाध्याय व जमनालाल बजाज यांना विनम्र अभिवादन
Date : 11 Feb 2026
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने 'एकात्म मानव दर्शन' अंत्योदयचे प्रणेते भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक पंडित दीनदयाल उपाध्याय आणि थोर देशभक्त, प्रसिद्ध उद्योगपती जमनालाल बजाज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
Back To Home Page
मनपाच्या उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड व अतिरिक्त आयुक्त (प्रभारी आयुक्त) श्रीमती वसुमना पंत यांच्या हस्ते मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात स्थित पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री.राजेश भगत, श्री.मंगेश खवले, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. अमोल तपासे, श्री जितेश धकाते, श्री, सुधीर कोठे, श्री. प्रमोद बराई यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी बजाज नगर चौक स्थित जमनालाल बजाज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी मनपाचे कर्मचारी व अग्निशमन जवान उपस्थित होते.