सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 59 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 11 Feb 2026
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता करणे (रु. 400 दंड) या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून रुपये 8,000 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. 400 दंड) या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रुपये 400 रूपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लाँजिग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रुपये 2,000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून रुपये 5,000 रुपयांची वसुली करण्यात आली.
चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून रुपये 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गराज व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकाने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून रुपये 4,000 रुपयांची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटींग चेम्बर नसल्याने, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे, कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी फेकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करुन रुपये 10,000 रुपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 23 प्रकरणांची नोंद करून रुपये 4,600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत श्री. राकेश भंडारी प्लॉट क्र.०२ जीवन सोसायटी यांनी रस्त्यावर सांडपाणी टाकल्यामुळे रु. 5,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच धरमपेठ झोन अंतर्गत मे. बेला विस्टा हॉटेल, सिव्हिल लाईन आणि श्री.गोविंद यादव, तेलंगखेडी, यांनी रस्त्यालगत कचरा टाकल्यामुळे प्रत्येकी, रु 5,000 चे असे एकूण 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तर मे. स्काय सिटी होटल, रामदासपेठ आणि मे. ओयो होटेल सेलिब्रेटी यांनी विद्युत खांबांवर विनापरवानगी फलक लावले आणि झाडावर बॅनर होर्डिंग लावल्यामुळे केल्याबद्दल प्रत्येकी 5,000 चे असे एकूण 10,000 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच हनुमाननगर झोन अंतर्गत मे. साई संकल्प ईन्फा,हनुमानगर यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रु.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. हरी किराणा स्टोर्स, शुक्रवारी तलाव रोड यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. तसेच मे. श्याम फॅशन हाऊस गांजाखेत चौक, गांधीबाग यांनी रस्त्यालगत कपड्याच्या दुकानातील पुतळे रस्त्यालगत ठेवल्याबद्दल रु.10,000 चे दंड वसूल करण्यात आले. तसेच सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. नंदनवार गार्मेट्स, मस्कासाथ, इतवारी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे.टेम्पटेशन बार ॲड रेस्टॉरेंट, मानकापूर यांनी रेस्टॉरेंटमधील स्वयंपाकघरातील सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी जवळील मोकळ्या जागेवर सोडल्यामुळे हरित लवाद कायदा अंतर्गत रु.10000 दंड वसूल करण्यात आले. तसेच मे. सिद्धी विनायक इंन्फा, मिसाळ ले आऊट यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रु. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 11 प्रकरणांची नोंद करून रू. 75,000 दंड वसूल केला.