सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 74 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 13 Feb 2026
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. श्यामसुंदर अपार्टमेंट-2 यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. लिविनो अपार्टमेंट-21 यांनी रस्त्यावर घाणेरडे पाणि टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. किरण चौधरी यांनी इमारत बांधकामाच्यावेळी वायुप्रदुषणाची काळजी न घेतल्यामुळे रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. आरएनआर डेव्हलपर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. मे. शोभा आरटीफिशियल ज्वेलरी यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. वेंकटेश प्रेस्टीज-2 यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.शारदा गिफट कॉर्नर व मे. अमर किराणा स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू.5,000 या प्रमाणे रू. 10,000 चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. माया स्वीटस् यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू.60,000 दंड वसुल केला.