नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.मंगळवार(ता.17) शोध पथकाने 83 प्रकरणांची नोंद करून 48,200 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 24 प्रकरणांची नोंद करून 9,600 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.200 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 6 प्रकरणाची नोंद करून 2,400 रूपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून 13,000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.2,000 वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.2,000 वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून रू.5,000 वसुली करण्यात आली. हॉटेलमध्ये डिसेलटींग चेंबर नसणे किंवा चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे ,कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.10,000 वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 20 प्रकरणांची नोंद करून 4,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. अक्षया कंस्ट्रक्शनस् यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत संतोष मिश्रा बांधकामाच्या वेळी वायु व ध्वनी प्रदूषण केल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. शकुंतला अपार्टमेंट यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.महेश प्रोव्हिजन्स व मे. रामदेव किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू.5,000 या प्रमाणे रू. 10,000 चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. महेश अगरबत्ती यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे.हॉटेल बारबेक्यू व मे. पिकोलो कॅफे यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू.5,000 या प्रमाणे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू.50,000 दंड वसुल केला.