ऑरेंज स्ट्रीटवरील वाहन पार्किंग स्थळाची आयुक्तांनी केली पाहणी
वाहतूक कोंडी संदर्भात एनडीएस पथक व वाहतूक पोलीसांना दिले निर्देश
Date : 17 Feb 2026
यावेळी मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. गिरीश गोडबोले, कार्यकारी अभियंता श्री. रविंद्र बुंधाडे, कार्यकारी अभियंता श्री. अनिल गेडाम, नगररचना विभागाचे सहायक संचालक श्री. ऋतुराज जाधव, झोनचे सहायक आयुक्त श्री. धनंजय जाधव, प्रकल्प अभियंता श्री. राजीव गौतम उपस्थित होते.
वर्धा मार्गावरील जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन चौकातून ऑरेंज स्ट्रीटवर वर्दळीच्या काळात रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या मार्गावर असलेल्या व्यावसायिक आस्थापनांनी ग्राहकांसाठी केलेल्या पार्किंग स्थळाची पाहणी देखील आयुक्तांनी यावेळी केली. चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पुरेशी पार्किंगची व्यवस्था येत्या १५ दिवसात करण्याचे निर्देश आयुक्तांनी व्यावसायिक आस्थापनांच्या संचालकांना दिले.
त्याचप्रमाणे ऑरेंज स्ट्रीटवर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथक (एनडीएस) तसेच वाहतूक पोलीस विभागाशी समन्वय साधून वाहतूक पोलीस तैनात करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले. त्याचप्रमाणे दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना पार्किंगची व्यवस्था असल्याचे दिशादर्शक फलक या जागेवर ठळकपणे दिसतील अशा ठिकाणी आस्थापनांच्या मालकांनी लावावे. जेणेकरून ग्राहकांना पार्किंगची व्यवस्था असल्याची ठळक माहिती तात्काळ मिळेल. तसेच आस्थापनांचे कर्मचारी देखील तैनात करून रस्त्यावर कोणतेही वाहन उभे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. असेही आयुक्तांनी यावेळी सुचविले.