मानकापुर परिसरातील हिपॅटायटिस ‘ए’ साथ रोखण्यासाठी मनपा आरोग्य विभागाची तातडीची कारवाई
Date : 18 Feb 2026
सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत RRT (रॅपिड रिस्पॉन्स टीम) मार्फत सर्वेक्षण हाती घेण्यात आले असून बाधित भागात घराघरांत जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.
तपासादरम्यान परिसरातील नागरिकांना कावीळ, उलट्या, ताप, पोटदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे जानेवारी च्या शेवटच्या आठवड्यात प्रथमतः दिसून आलेल्याचे नागरिकांनी सांगितले.
सर्वेक्षण दरम्यान मागील 1 महिन्यापासून कावीळ, उलट्या, ताप, पोटदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे असलेल्या 6 ते 8 रुग्णांची माहिती आढळली असून त्यांना प्रत्यक्षात भेट देण्यात आली. त्यापैकी ५ संशयितांना हिपॅटायटिस 'ए' या संसर्गजन्य आजार तर ३ संशयित यांना इतर आजार असल्याचे आढळून आले.
महानगरपालिकेच्या ऑरेंज सिटी वॉटर (OCW) द्वारे १५ जानेवारी २०२६ पासून या क्षेत्रात नवीन पाणी पाईपलाईन टाकण्याचे चे काम सुरू असताना काही ठिकाणी गळती व दूषित पाण्याची शक्यता नागरिकांनी दर्शविली असून, त्यात OCW मार्फत तत्काळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
परिसरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी क्लोरीनेशन करण्यात आले असून नियमित पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. मनपा द्वारे जलजन्य आजार, परिसर स्वच्छता, पाणी स्वच्छता या विषयी घरोघरी जाऊन जनजागृती करणे व हस्तपत्र वाटप सुरू आहे. तसेच क्लोरिन गोळ्यांचे व ओ. आर. एस. पॅकेट चे वाटप करण्यात येत आहे व त्याबद्दल आवश्यक माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जात आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना उकळलेले व शुद्ध पाणी, क्लोरिन चे वापर करणे, ORS चे वापर करणे याबाबत आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आले आहे.