नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.बुधवार(ता.18) शोध पथकाने 63 प्रकरणांची नोंद करून 57,700 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून 8,000 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.200 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 400 रूपयांची वसुली करण्यात आली.मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू. 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 8,500 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.2,000 वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.2,000 वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विके्रता,यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.2,000 वसुली करण्यात आली.वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून रू.3,000 वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून रू. 20,000 वसुली करण्यात आली.हॉटेलमध्ये डिसेलटींग चेंबर नसणे किंवा चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे ,कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.5,000 वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून 2,600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत अक्षय घोगुलवार,दिलीप राठी व मे. साई सफल हॉस्पीटल यांनी रस्त्यालगत बांधकामाचे टाकाउ साहित्य टाकल्यामुळे प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू.15,000 चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत शिव कटारिया बांधकामाच्या वेळी वायु व ध्वनी प्रदूषण केल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. एसआयआयटी टयुटोरियल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. दालचा सेंटर यांनी रस्त्यालगत उरलेले अन्न टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत मे. एस.एस.पाटील अँड कंपनी यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. क्रिस्टल फर्नीचर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे टाकाउ साहित्य टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.रझा किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे.रिलायन्स स्मार्ट पॉइंट यांनी रस्त्यालगत दुकानाचा कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 10 प्रकरणांची नोंद करून रू.55,000 दंड वसुल केला.