मनपातर्फे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन
Date : 20 Feb 2026
नागपूर महानगरपालिकेतर्फे मराठी पत्रकारितेचे जनक “दर्पणकार” आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता.२०) विनम्र अभिवादन करण्यात आले.मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड व मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
Back To Home Page
याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री.निर्भय जैन, उपायुक्त श्री.मंगेश खवले, सहायक आयुक्त श्री.श्याम कापसे, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, क्रीडा अधिकारी डॉ.पियुष आंबुलकर, श्री.प्रमोद हिवसे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.